गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलिस शहीद

12

भामरागड, १५ ऑगस्ट २०२० : गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात कोठी गावात किराणा सामान आणायला गेलेल्या दोन पोलिसांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलिस शहीद झाला.

दुष्यंत नंदेश्वर असं या पोलिसाचं नाव असून दिनेश भोसले हा जवान जखमी झाला आहे. कोठी इथल्या पोलिस मदत केंद्रात कार्यरत असणारे हे जवान आज सकाळी साडेआठच्या सुमाराला किराणा सामान आणण्यासाठी दुकानात गेले असता दबा धरुन बसलेल्या दोन-तीन नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी