फ्लोरिडा, १४ डिसेंबर २०२२: जपाननं प्रथमच चंद्राच्या दिशेनं मून लँडर पाठवलंय. तेही खासगी कंपनीनं बनवलंय.श आणि खासगी कंपनीच्या रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आलं. जपानच्या स्पेस स्टार्टअप ispace Inc ने आपलं Hakuto-R मिशन चंद्रावर पाठवलंय. स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटमधून ही मोहीम पाठवण्यात आली होती. केप कॅनवेरल, फ्लोरिडा येथून पक्षपित करण्यात आलं.
या मोहिमेचं प्रक्षेपण दोनदा पुढं ढकलण्यात आलं. कारण SpaceX च्या Falcon-९ रॉकेटची तपासणी सुरू होती. रॉकेट अवकाशाकडं कूच करत असताना, अमेरिका आणि टोकियो या दोन्ही देशांतील शास्त्रज्ञ, खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कारण एखाद्या देशाचं खासगी अवकाशयान चंद्रावर रवाना होण्याची ही पहिलीच वेळ होती.
यापूर्वी केवळ अमेरिका, रशिया आणि चीनच्या राष्ट्रीय अवकाश संस्थांनी चंद्रावर लँडर पाठवले आहेत. चंद्रयान-२ मोहिमेअंतर्गत भारतानं हा प्रयत्न केला. पण ऑर्बिटर यशस्वी झालं. परंतु चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंगमुळे विक्रम लँडरचं नुकसान झालं. जपानचं हे मिशन यशस्वी झालं तर त्यांचे अमेरिकेसोबतचे संबंध आणखी सुधारतील.
यावेळी चीन अवकाश उद्योगात वेगानं पुढं जात आहे. त्याला तोंड देण्यासाठी जपान आणि अमेरिका यांच्यातील मैत्री उपयुक्त ठरेल. रशियाचं रॉकेट यावेळी वापरलं गेलं नव्हतं कारण त्यांनी युक्रेनवर हल्ला केलाय. त्यानंतर जपानी स्टार्टअपनं स्पेसएक्सशी संपर्क साधला. ही संधी जपानसाठी खूप खास आहे. काही दिवसांपूर्वीच जपानचे अब्जाधीश युसाकू मेझावा यांनी आठ जणांना चंद्रावर जाण्याचा निर्णय घेतला होता. ही ट्रिप पुढील वर्षी होणार आहे.
Hakuto म्हणजे पांढरा ससा. हे चंद्रावर राहणारे जपानी लोककथेचं पात्र आहे. या प्रकल्पानं त्याच्या व्यावसायिक प्रक्षेपणापूर्वी Google Lunar पुरस्कार देखील जिंकलाय. पुढील वर्ष जपानमध्ये year of rabbit म्हणून साजरं होणार आहे. हे अंतराळयान जर्मनीमध्ये असेंबल करण्यात आलंय. पुढील वर्षी एप्रिलच्या अखेरीस ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरंल. लँडिंग करण्यापूर्वी, हाकुटो-आर लँडर नासाचा एक छोटा उपग्रह चंद्राच्या कक्षेत सोडेल. जे अॅटलस क्रेटरवर पाण्याचा शोध घेईल.
लँडरचं नाव एम1 आहे. यात दोन रोबोटिक रोव्हर आहेत. त्यांचा आकार बेसबॉलच्या बरोबरीचा आहे. याशिवाय यूएईचा रशीद एक्सप्लोरर हा चारचाकी आहे. हा रोव्हर आहे. एक प्रायोगिक सॉलिड स्टेट बॅटरी त्याच्यासोबत जात आहे. ज्याची चंद्राच्या पृष्ठभागावर चाचणी केली जाईल. रशीद रोव्हरचं नाव दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल-मख्तूम यांच्या नावावर आहे. रशीद स्पेस सेंटरवरून त्यांनी हे प्रक्षेपण पाहिलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे