Ashok Saraf Padamshri Award: मराठी आणि हिंदी सिने नाट्यसृष्टीतील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना २०२४ साली त्यांच्या अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा करण्यात आली होती.
काल नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कार विजेत्यांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी हास्यसम्राट अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी राष्ट्रपतींसह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आभार मानले आहेत. “पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबीयांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचा प्रेम आणि आशिर्वाद कायम असाच राहू द्या, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
याशिवाय पुरस्कार स्वीकारण्याआधी अशोक सराफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सभागृहातील उपस्थितांना अभिवादन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी, इंदिरा तेंडोलकर