first transgender toilet in Pune: पुणे महानगरपालिकेने एक ऐतिहासिक पाऊल उचलत तृतीयपंथीय समुदायासाठी भारतातील पहिली विशेष शौचालय पुण्यात उभारली आहे. या उपक्रमामुळे या समुदायाला सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गैरसोयीपासून मोठा दिलासा मिळणार आहे.तृतीयपंथीय हक्कासाठी गेल्या दोन वर्षांपासून लढा देणाऱ्या डॉ. आम्रपाली मोहिते यांनी या प्रकल्पाला यशस्वी केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
त्यांनी सांगितले की, “ही केवळ सुरुवात आहे. एक-दोन मुताऱ्या उभारून चालणार नाही, तर सरकारी कार्यालये, रेल्वे स्थानकं, बस स्टॉप्स आणि गर्दीच्या ठिकाणीही अशा सुविधा पुरवणं गरजेचं आहे.त्यांनी पुढे सांगितले की महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात तृतीयपंथीयांसाठी अशा समावेशक योजना राबवाव्यात. सरकारने आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी,दिनेश वढणे











































