Waiting room was set up Yerawada: येरवडा मध्यवर्ती कारागृहात राज्यभरातून अनेक कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यांना भेटण्यासाठी नातेवाईक मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या विविध भागातून पुण्यात येतात. मात्र, आतापर्यंत या नातेवाईकांना जेलबाहेर पावसात भिजत किंवा उन्हात उभं राहावं लागत होतं. त्यांच्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती.या पार्श्वभूमीवर पुण्यातील सायबेज सॉफ्टवेअर कंपनीने सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेत सुसज्ज प्रतीक्षालय उभारले आहे.
या प्रतीक्षालयात एकावेळी सुमारे 1000 लोक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.यामध्ये नातेवाईकांच्या सोयीसाठी बसण्याची उत्तम सोय, स्वच्छतागृहे तसेच कॅन्टीनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर झाली असून, त्यांना एक सुरक्षित आणि सुसज्ज जागा मिळाली आहे. हा उपक्रम कैद्यांच्या नातेवाईकांसाठी दिलासा देणारा ठरत असून यामुळे सामाजिक जबाबदारीची उत्तम उदाहरण घालून देणाऱ्या सायबेज कंपनीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, दिनेश वाढणे











































