दुधवा, यू पी, ८ जुलै २०२० : भारतात निसर्गाची खुप मोठी खाण आहे , असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आपल्या देशात अनेक दुर्मिळ वनस्पती, फुले, औषधी वनस्पती डोंगरद-या कपारींंधून उपलब्ध आहेत. अशी कैक निसर्गाची देणी भारताला मिळाली आहे.
याच देणगी मध्ये आज भारतामध्ये ११८ वर्षांनंतर ऑर्किड या दुर्मिळ फुलाची एक प्रजाती सापडली आहे. उत्तर प्रदेशातील दुधवा टायगर रिझर्व्हमध्ये हे फूल पाहायला मिळाले. या दुर्मिळ फुलाचे वैज्ञानिक नाव ” इव्लोफिया ऑबतूसा ” (Eulophia Obtusa) असे असून त्याची ओळख ग्राउंड ऑर्किड अशीही आहे.
दुधवा टायगर रिझर्व्हमध्ये वन अधिकारी आणि वन्यजीव तज्ज्ञाच्या निरीक्षणादरम्यान आर्किड प्रजातीचे ” इव्लोफिया ऑबतूसा ” (Eulophia Obtusa) हे फूल पाहायला मिळाले. हे फुल अखेरचं १९०२ मध्ये पीलीभीतमध्ये पाहायला मिळाले होतं.
इंग्लैंडमध्ये क्यू हर्बेरियमच्या दस्तावेजात याची नोंद आहे. १९ व्या शतकात गंगा नदीच्या मैदानी भागातून वैज्ञानिकांनी ही वनस्पती येथे आणली होती. पण, मागील १०० वर्षांपासून ही प्रजाती पाहायला मिळाली नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी