आज देखील शेअर बाजारात विक्रमी वाढ..

मुंबई, १० नोव्हेंबर २०२०: उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात यासारख्या विधानसभा आणि पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, भारतीय शेअर बाजार विक्रमी वाढीसह सुरू झालाय. बीएसई सेन्सेक्सनं आपल्या इतिहासात प्रथमच ४३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सकाळी पावणे अकराच्या सुमारास सेन्सेक्सनं ४३ हजारांचा टप्पा ओलांडला. सकाळी ११ च्या सुमारास सेन्सेक्स ४३,११८.११ च्या ऐतिहासिक उंचीवर पोहोचला.

तर दुसरीकडं निफ्टी फिफ्टी बाबत बोलताना आज सुरू झालेल्या सकाळच्या ट्रेडिंग मध्ये निफ्टी इंडेक्स १२,५९८.३५ च्या पातळीवर पोहचला. आजची ट्रेडिंग सुरू होताच बँकिंग सेक्टर मधील शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली तर दुसरीकडं आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

सेन्सेक्स सकाळी ४२,९५९.२५ वर पोहोचला ज्यासाठी सेन्सेक्समध्ये ३६२ अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये झालेली ही आजची वाढ उच्चांकी आहे. त्याचप्रमाणं नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीदेखील १२,५५६.४० च्या ऐतिहासिक उच्च पातळीवर उघडला.

सोमवारी देखील बाजारात तेजी

जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेतांमुळं बीएसईचा सेन्सेक्स सोमवारी ७०४ अंकांनी वधारला आणि नवीन विक्रमी स्तरावर बंद झाला. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बिडेन यांच्या विजयानंतर जागतिक बाजारपेठांना वेग आला आहे, ज्याचा देशांतर्गत बाजारावरही चांगला परिणाम झाला. तीस समभागांवर आधारित बीएसईचा सेन्सेक्स व्यापार दरम्यान ४२,६४५.३३ अंकांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा