‘एक दुःखद दिवस’ पुनावाला यांनी व्यक्त केली भावना, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ लाखांची मदत

पुणे, २२ जानेवारी २०२१: काल दुपारी पुण्याच्या मांजरी भागातील  सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली होती, त्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. काही तासांच्या आतच ही आग आटोक्यात आली. तसेच काहीतरी विद्युत बिघाडामुळे आग लागल्याचे प्राथमिक अंदाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेताना बोलले. तसेच या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसीचे डोस होते की नाही याबद्दल अनेकांना प्रश्न पडले होते.

मात्र यामध्ये कोरोना लसीचे डोस नव्हते असे समजले आहे. मात्र सीरमचे सीईओ अदर पुनावाला  यांनी प्रतिक्रिया देत या अगीमधे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणालाही गंभीर इजा झालं नसल्याचे बोलले होते. पण, त्याच प्रतिक्रियेच्या काही वेळातच एक दुःखद वार्ता  तेथून आली.

मांजरी भागातील सीरम इन्स्टिट्यूट मधे लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आणि लगेच अदर पुनावाला यांनी हि माहिती ट्विट करत दिली. तसेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. ज्यामुळे संपूर्ण राज्यातील नागरिक व तसेच सोशल मिडियावर या प्रकरणी हळहळ व्यक्त केली जात आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांना शंका…

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट मधे लागलेल्या आगीबद्दल प्रतिक्रिया देताना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शंका व्यक्त केली आहे. “आग लागली हे मला सोशल मिडिया आणि व्हाॅटसॲप वरून समजलं, ही आग लागली आहे कि लावली आहे याची चौकशी झाली पाहीजे.”अशी मागणी ते मुंबईच्या पत्रकार परिषदेत बोलत असताना करत होते.

उपमुख्यमंत्र्याची भेट तर मुख्यमंत्री ही लवकरच घेणार भेट….

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिरम इन्स्टिट्यूट मधे घडलेल्या घटनेमुळे भेट दिली व या घटनेचे ऑडिट होणार आसल्याचे सांगितले. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी सीरमच्या युनिटला भेटून घटना स्थळाची पाहणी करणार आहेत.
एक दुःखद दिवस….

सीरमचे अध्यक्ष पुनावाला यांनी या घटनेवर दुख्ख व्यक्त करत

या घटने मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच”सीरम साठी आजचा दिवस अतिशय दुःखद आहे. मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या दुखात आम्ही सहभागी आहोत. कंपनीच्या निर्धारित नियमांच्या पलिकडे जाऊन मदत जाहीर करत आहोत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा