बुलढाण्यातील एक धक्कादायक घटना, धावत्या एक्सप्रेस समोर उडी घेऊन प्रेमी युगलाची आत्महत्या

64

बुलढाणा, २२ ऑक्टोबर २०२२: बुलढाण्या जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानकापासून जवळच एका तरूण-तरुणीने रात्री शेगाव ते नागझरी दरम्यान नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एक्सप्रेस खाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली आहे.

यातील तरुण येथे असलेल्या संग्रामपूर तालूक्यातील कवठलं गावात राहणारा आहे. अजय असे त्याचे नाव. वय वर्ष २२ अशी ओळख पटली आहे. तर १४ वर्षीय तरुणी याच परिसरातील असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. तर दोघांची ओळख पटली असून ते प्रेमी युगुल असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

दोघेही जवळच्या संग्रामपूर तालूक्यातील कवठलं परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे‌. पण यांनी आत्महत्या का केली याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. ही आत्महत्या आहे की घातपात यावर आता पोलीस तपास करत आहेत. शेगाव रेल्वे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर