विएना (ऑस्ट्रेलिया), ३ नोव्हेंबर २०२०: युरोपमधील ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना शहरात ज्यू यहूदी सभागृहात सशस्त्र लोकांनी ६ वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडवून आणली. डेली मेलच्या वृत्तानुसार या दहशतवादी घटनेत हल्लेखोरांसह ७ जणांचा मृत्यू झाला आहे. विएना पोलिस विभागाच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात बरेच लोक जखमी झाले आहेत.
विएना पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये असं सांगण्यात आलं की, रात्री आठ वाजता गोळीबार झाल्याची घटना घडली असून त्यात अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. ट्वीटमध्ये पुढं असंही सांगितलं गेलं आहे की, बऱ्याच संशयितांना रायफलींनी सज्ज असलेल्या अवस्थेत पहाण्यात आले आहे. गोळीबारची घटना शहरातील ६ वेगवेगळ्या ठिकाणी घडली. या घटनेत एका अधिकाऱ्यासह बरेच लोक जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त, पोलिस अधिकाऱ्यांनी एका संशयित हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केलं.
विएना पोलिसांनी आणखी एका ट्विटमध्ये लोकांना या हल्ल्याबाबत सावधगिरी बाळगण्यास सांगितलं आहे. लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्याबरोबरच पोलिसांनी अफवांपासून दूर राहण्यासही सांगितलं आहे. पोलिसांनी लिहिलं, “कृपया कोणतीही अफवा, आरोप, अनुमान किंवा बळी पडलेल्यांची पुष्टी न झालेली संख्या पाहू नका – यामुळं कोणत्याही प्रकारे मदत होणार नाही! आत रहा! आश्रय घ्या, सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहा.”
दरम्यान, सशस्त्र संशयितांपैकी एक सिनेगॉग मधून बाहेर पडताना दिसला. हल्लेखोरांनी पळून जाण्यापूर्वी गोळीबार केला. ऑस्ट्रियाचे आंतरिक व्यवहार मंत्री कार्ल नेहमेर यांनी सोमवारी उशिरा सांगितलं की, मध्य व्हिएन्नामधील एका बड्या सभास्थानाजवळ झालेला गोळीबार हा दहशतवादी हल्ल्यासारखा दिसत होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे