संगीतचा एक तारा निखळला, जेष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे निधन….

6

न्यू जर्सी, १८ ऑगस्ट २०२० : संगीत जगतातले जेष्ठ गायक संगीत मार्तंड पद्म विभूषण पंडित जसराज यांचे सोमवारी न्यू जर्सी, अमेरिका येथे निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी आखेरचा श्वास घेतला. त्यांच्य् जाण्यानें संगीत जगतावर शोककळा पसरली. त्यांचे संगीतामध्ये फार मोठे योगदान असून त्यांनी शास्त्रीय संगीत भारतातच नाही, तर संपुर्ण विश्वामध्ये पसरवले होता.

पंडितजीचा अल्प परिचय

२८ जानेवरी १९३० मधे जन्मलेल्या पंडित जसराज यांच्या घराण्यातच गायकी होती. पंडित जसराज यांचे वडील मोतीराज सुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते. त्यामुळे पंडित जसराज यांना घराण्यापासूनच संगीताचा वारसा लाभला होता. वडिलांपासून त्यांचाकडे हा वारसा आला आणि संघर्ष, मेहनत, लगन आणि रियाज करुन भारतीय संगीत क्षेत्राला त्यांनी फार मोठे योगदान दिले होते. पंडितजींना त्यांच्या या कार्यासाठी अनेक मान सम्मान देखील मिळाले आहेत. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी भारत सरकार ने त्यांना पद्मश्री, पद्मभुषण आणि पद्मविभुषण पुरस्काराने सम्मानित केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही वाहिली आदरांजली….

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटर वरून त्यांनी वाहिली श्रद्धाजंली….

 

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा