मुंबई, १५ मे २०२३ : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झीरवाळ यांना ७९ पानांचे निवेदन सादर केले आहे. यामध्ये त्यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेवर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केल्याची माहिती आमदार सुनील प्रभू यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने १२ फेब्रुवारी रोजी आपला निकाल दिला आहे.या निकालाने राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा मिळाला असला, तरी १६ आमदारांच्या अपात्रते चा निर्णय राज्य विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. असे आपल्या निकालात कोर्टाने म्हणले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वच पक्षांकडून याबाबत वेगवेगळे दावे प्रती दावे केले जात आहेत. दोन्ही बाजूंनी निर्णय आमच्या सारखाच येणार असे सांगितले जात आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सध्या आपल्या परदेश दौऱ्यावर आहेत. अध्यक्ष परदेश दौऱ्यावर असल्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे ठाकरे गटाकडून निवेदन देण्यात आले आहे. आता विधानसभा अध्यक्ष यावर काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर