मुंबईतील एक अजब घटना, दोघांत एकतीस वर्षांचे अंतर हे प्रेमसंबंध नव्हे; पोक्सो न्यायालयाचा निर्णय

मुंबई, २६ ऑक्टोबर २०२२: पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी यांच्यात एकतीस वर्षांचे अंतर असताना त्यांच्यात प्रेमसंबंध आहेत हे न पटणारे आहे, असे निरीक्षण नोंदवत सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने फेसबुकवरील भेटीतून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या ४५ वर्षीय व्यावसायिकाला जामीन देण्यास नकार देण्यात आला आहे.

मुंबईमध्ये राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीची या ४५ वर्षीय व्यावसायिकाशी फेसबुकवर ओळख झाली होती. आरोपीने त्या मुलीला एक फोनही भेट म्हणून दिला होता. त्याने आपले वय २५ असल्याचे सांगितले होते. सुरवातीला ते दोघे एका बागेत भेटल्यानंतर ते दर आठवड्याला एकत्र बाहेर फिरु लागले.

एकदा घरी मुलीचे आई वडील नसताना आरोपी घरी आला असता लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर जबरदस्ती केली. ही बाब शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तिच्या पालकांना सांगितले असता त्यांनी मुलीला विचारले असता तो आपला फेसबुक मित्र आहे असे सांगितले, नंंतर मुलगी सतत फोनवर असल्याने पालकांनी जबरदस्ती करुन विचारले तेव्हा मुलीने सर्व प्रकार सांगितला.

याबाबत पालकांनी आरोपीविरोधात मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. त्यानंतर आरोपीने जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्या अर्जावर विशेष न्यायाधीश प्रिती कुमार घुले यांच्या समोर सुनावणी झाली. तेव्हा त्यांनी हा निर्णय दिला आहे की, हे प्रेमसंबंध नाहीत म्हणून आरोपीला जामिन दिला जाणार नाही.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा