शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये अशी व्यवस्था उभारावी: अमित देशमुख

लातूर, १८ ऑगस्ट २०२० : लातूर जिल्हयातील वीज पुरवठा नियमित करावा, कमीतकमी वेळेत रोहीत्रे दुरूस्त करून दयावेत, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना वीजपुरवठा बाबत कोणतीही अडचण येऊ नये अशी व्यवस्था उभारावी, अशा सुचना वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज दिल्या.

लातूरच्या शासकीय विश्रामगृहावर महावितरण कंपनी अधिकाऱ्यांसोबत जिल्हयातील वीजव्यवस्थेबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. लातूर महापालीका सोलार प्रकल्प उभारणीचे नियोजन करीत आहे.

त्यासाठी महावितरणाने तांत्रीक माहीत आणी सहकार्य करावे, अशी सुचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी केली. लातूर शहरातील वीज वाहिन्या अंडरग्राउंड करण्याबाबत आराखडा आणि प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा