गोल पोस्ट राष्ट्रीय पुलवामामध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार, जवान जखमी

पुलवामामध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार, जवान जखमी

जम्मू-काश्मीर, 28 एप्रिल 2022: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं आहे. मित्रीगाम परिसरात 2-3 दहशतवादी लपल्याची खबर सुरक्षा दलांना मिळाली होती. यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याचा समावेश आहे. त्यावर पोलिसांसह सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली. या चकमकीत एक जवान जखमी झालाय.

आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितलं की, काही नागरिकही त्या भागात अडकले होते, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन काही काळ थांबवण्यात आलं होतं. मात्र, पुन्हा कारवाई सुरू असताना एक दहशतवादी मारला गेला. अजूनही चकमक सुरूच आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version