गोल पोस्ट राष्ट्रीय वडोदरामध्ये तीन मजली इमारत कोसळली, तीन मजूर ठार, अनेक जखमी

वडोदरामध्ये तीन मजली इमारत कोसळली, तीन मजूर ठार, अनेक जखमी

गुजरात, २९ सप्टेंबर २०२०: गुजरातमधील वडोदराच्या बावा मान पूरा भागात नव्यानं बांधलेली इमारत कोसळली. यात तीन मजुरांचा मृत्यू झालाय. उर्वरित जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अग्निशमन विभागचं बचावकार्य चालू आहे.

घटनेच्या ठिकाणी मदत व बचावकार्य सुरू आहे. सांगण्यात येत आहे की, ही तीन मजली इमारत आधीपासून एका बाजूला झुकलेली होती. लोकांनी याबाबत प्रशासनाकडं तक्रार देखील केली होती. मात्र, इमारत कोसळल्यानं अनेक वाहनांचंही नुकसान झालं आहे.

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील भिवंडीतील इमारत कोसळली होती, त्यात ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. २१ सप्टेंबर रोजी पहाटे ३.४५ च्या सुमारास पटेल कंपाऊंडची चाळीस वर्षे जुनी असलेली ही इमारत कोसळली होती.

जेव्हा ही इमारत कोसळली, त्यावेळी या इमारतीत राहणारे लोक झोपेत होते. मोठ्या संख्येनं लोक ढिगाऱ्याखाली दाबले गेले आणि त्यांना बाहेर काढण्यात आलं. यासाठी श्वान पथकासह स्थानिक बचाव दल आणि एनडीआरएफ यांच्यासह २४-२५ हून अधिक लोकांचा शोध घेण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version