भटक्या कुत्र्यांच्या जेवणासाठी अनोखा ॲप…

8

पुणे, २० ऑगस्ट २०२२ : सध्याचे जग हे डिजिटल मिडीयाचे आहे. प्रत्येक गोष्ट ॲपवर आली आहे. आता यातून कुत्री मांजरीदेखील वाचलेल्या नाहीत. आता भटक्या कुत्र्यांसाठी, त्यांच्या जेवणाचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन ॲप बाजारात आले आहे. दिल्लीच्या शिव नादार शाळेच्या मुलांनी हे खास ॲप तयार केले आहे. त्यासाठी खास प्रकारची यंत्रणा तयार करण्यात आली असून त्यामुळे, रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या खाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सोसायटी, बाग किंवा इतर ठिकाणी असणाऱ्या कुत्र्यांसाठी ही यंत्रणा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या यंत्रणेत विद्यार्थ्यांनी कुत्र्याची भाषा वापरली असून, साप किंवा इतर प्राण्यांप्रमाणे कुत्र्यांची भाषा वापरली जाते. त्यानुसार त्यांना एका ठिकाणी आकृष्ठ केले जाते.

सध्याच्या सर्वेनुसार तब्बल ८० अब्ज कुत्री आणि मांजरी यांचा खाण्याचा प्रश्न यामुळे सुटणार आहे. यात एक खास धातुचे झाकण असणारे भांडे असून त्यात कुत्र्यांसाठी किबल ( डॉग फूड) ठेवले जाणार आहे. त्यातून कुत्र्यांच्या भाषेतून येणाऱ्या आवाजामुळे कुत्री त्या भांड्याकडे आकर्षित होऊन त्यांना अन्न मिळेल, हा या ॲपचा मुख्य उद्देश आहे. त्या भांड्यात एक छोटा कॅमेरा देखील लावण्यात आला असून, कुत्री जेवत आहेत किंवा नाही, त्यांचा रंग कुठला, त्यांनी किती प्रमाणात अन्न खाल्ले याची संपूर्ण विस्तारीत माहिती त्या ॲपमुळे कळणार आहे. तसेच त्या भांड्याला अल्ट्रा सोनिक किरणांची यंत्रणा वापरली आहे. त्यामुळे सर्व बाजूंनी हे ॲप नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.

अनेक जण रस्त्यावरच्या कुत्र्याला खायला घालतात. पण यात अनेक कुत्री उपाशी राहतात. तर अनेक कुत्री काही वेळा भुकेली असल्यामुळे पुन्हा पुन्हा खाऊ शकतात. अशा वेळी तुम्हाला या ॲपमुळे संपूर्ण आणि सविस्तर माहिती मिळू शकते. लवकरच हे ॲप आता मोबाईलवर येणार असून त्यासाठी टीम काम करत आहे. त्यामुळे आता लवकरच या ॲपमुळे भटक्या कुत्र्यांच्या जेवणाचा प्रश्न सुटेल यात शंका नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा