शेवगाव, २३ ऑगस्ट २०२०: मागील काही वर्षांपासून देशामध्ये धर्मावरून तेढ निर्माण करणं व समाजात फूट पाडण्याचं काम वाढत चाललं आहे. परंतु, आजच्या काळात देखील एक सर्वांसाठीच आदर्श ठरणारी घटना समोर आली आहे. ही घटना आहे बोधेगाव येथील भुसारी परिवारातील. हिंदू-मुस्लीम ऐक्याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून ही घटना समोर आली आहे.
खेड्यापाड्यात तर असं धार्मिक राजकारण फारसं प्रभावी ठरत नाही. खेडे पाडे किंवा ग्रामीण भाग म्हटलं की एकोपा, माणुसकी आणि सलोखा बघायला मिळतो. असाच काहीसा प्रकार या घटनेत दिसून आला आहे. मानलेल्या हिंदू बहिणीच्या दोन मुलींच्या पालनपोषणास मदत करणारा तिचा मानलेला भाऊ धर्मानं मुस्लिम असला तरी मुलींच्या लग्नात देखील मामा म्हणून धावून आला आणि मामा म्हणून सर्व विधीही पार पाडले.
भुसारी कुटुंब हे नगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील रहिवासी आहे. त्यांच्याच घरासमोर ‘जुनून ए इंसानियत सोशल फाऊंडेशन’चे अध्यक्ष बाबाभाई पठाण हे राहतात. या दोन मुलींची आहे सविता या पतीच्या माझ्यामुळे वेगळ्या राहत होत्या. बेताची परिस्थिती असल्याने त्या धुणीभांडी करून आपला संसार चालवत होत्या. त्यांना एक मुलगा दोन मुली अशी आपत्य आहेत त्यांचे संगोपन पालन आणि शिक्षण देखील त्यांनीच पूर्ण केलं.
बाबा भाई पठाणी यांचे कुटुंब आणि सविता यांचे कुटुंब हे दोघेही समोरासमोर राग असल्यामुळ दोन्ही कुटुंबांमध्ये सलोखा वाढत गेला व भाऊ बहिणीचं नातं निर्माण झालं. भाऊबीज रक्षाबंधन सारखे सण सख्या भावा बहिणी प्रमाणे साजरे होऊ लागले. अगदी सख्ख्या बहिणी प्रमाणे सविता यांच्या दोन्ही मुलींचे शिक्षण देखील बाबा भाई पठाण यांनी पूर्ण केलं. आणि आता मुलींचे लग्न ठरलं तेव्हा सख्या भावाप्रमाणे लग्नात कन्यादानाचं कामदेखील पूर्ण केलं.
कोरोनाचं संकट घोंगावत असताना मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. मामा म्हणून बाबाभाई पठाण यांनी लग्नाचे सर्व विधी यथासांग पार पाडले. शिवाय, जुन्या वादामुळे दुरावलेल्या वडिलांची देखील समजूत घालून त्यांना लग्नासाठी हजर केलं. पाठवणीपर्यंतचे सर्व विधी बाबाभाईंनी मामा म्हणून पार पाडल्यानंतर सासरी निघताच दोन्ही मुलींना अश्रू अनावर झाले आणि ह्या मामाच्या गळ्यात पडत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी