पटना, दि. २४ जून २०२० : एकेकाळी बिहार पोलिसात एनकॉन्टर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे माजी डीएसपी कृष्णा चंद्र यांनी घरातच गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मानसिक अस्वस्थतेला आणि एका शेजाऱ्याला यासाठी जबाबदार धरले आहे.
के चंद्र यांना बिहार मधील एका धाडसी अधिकाऱ्यांमध्ये गणले जाते. याचबरोबर त्यांनी आपल्या ३७ वर्षाच्या कारकीर्दीमध्ये ६० पेक्षा जास्त त्यांनी एन्काऊंटर केले आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासहित पटना येथे राहत होते. आत्महत्याची बातमी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांना देखील धक्का बसला. बातमी मिळताच सर्व पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
के चंद्र पटनातील बेउर पोलिस स्टेशन परिसरातील मित्रमांडी कॉलनी फेज -२ मधील त्यांच्या घरात राहत होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी दोन पानांची एक सुसाइड नोटही लिहून ठेवली होती, जी पोलिसांना मिळाली आहे.
त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले की, गेल्या १६ वर्षांपासून माझ्यावर उपचार सुरू होते. मानसिक नैराश्यामुळे मी कित्येक महिने झोपलेलो नाही आणि आता माझ्या नैराश्यात शेजाऱ्यांमुळे देखील वाढ झाली होती. या सर्व कारणांमुळे त्यांनी आत्महत्या सारखे पाऊल उचलले.
आत्महत्या केल्याबद्दल त्यांनी आपली पत्नी व मुलांची माफी मागितली आहे आणि लिहिले आहे की आत्महत्येशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही मार्ग शिल्लक राहिला नव्हता. आपल्या दुसर्या सुसाईड नोटमध्ये मुलाला संबोधित करताना त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर मुलाने पुढे आयुष्यात काय करावे हे लिहिले आहे.
त्यांच्या मुलाने असे सांगितले आहे की, सांडपाणी व्यवस्था नीट नसल्यामुळे पाणी साठण्याची ही समस्या नेहमीच होत असे, याचा त्यांना त्रास होत होता त्याच बरोबर नगरपालिका देखील या कामांमध्ये दुर्लक्ष करत होती या सर्वांचा त्यांना मानसिक त्रास होत होता. त्याचबरोबर या घटनेनंतर संपूर्ण परिसरातील लोक आश्चर्यचकित झाले आहेत की ज्या डीएसपीने कित्येक गुन्हेगारांचे एन्काऊंटर करून गुन्हेगारांवर आपली दहशत माजवली होती त्या डीएसपी ने इतक्या किरकोळ कारणावरून आत्महत्या कशी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी