अदित्य ठाकरे यांचा छत्र परिषदेला न जाण्याचा निर्णय

मुंबई: अदित्य ठाकरे छत्र परिषदेच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय नोदणी (एन पी आर) आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (एन सी आर) विरोधात होणार आहे. यानिमित्त विद्यार्थी परिषढ होणार आहे. अदित्य ठाकरे छत्र परिषदेच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे ट्विट शिवसेना ने केले आहे.

होणाऱ्या या विद्यार्थी परिषदेला आदित्य ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले होते. हे निमंत्रण आदित्य ठाकरेंच्या कार्यालयाकडून स्वीकारण्यात ही आले होते. या परिषदेत उमर खालिद, रीचा सिंग, सलमान इंतेहाज असे विविध देशव्यापी विद्यार्थी संघटनेचे आंदोलन करणारे नेते सुद्धा येणार आहेत.

यातील उमर खालिद विषयी बोलायचे झाले तर अफजल गुरु यांच्या समर्थन पर त्यांनी घोषणा बाजी केली होती. तासेत त्याने या विरोधात आंदोलनेही केली होती. या कारणास्तव त्याच्यावर अनेक गुन्हे देखील लागले होते. समाजातून ही त्याच्या या कृत्याला विरोध करण्यात आला होता. यामुळे उमर खालिद एक वादग्रस्त व्यक्तिमत्व ठरले आहे.

एकंदरीत हे सर्व पाहत आदित्य ठाकरे अश्या व्यक्तींसोबत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणे सेवसेनेला अडचणीत आणू शकते. कारण या प्रकारानंतर विरोधक आक्रमक होऊ शकतात. शिवसेनेवर विरोधकांकडून टीकेला सामोरे जावे लागेल. हे सर्व टाळण्यासाठी आदित्य ठाकरे अश्या ठिकाणी उपस्थित नसणे योग्य आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी आता कळवले आहे की, ते या परिषदेला उपस्थित राहणार नाहीत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा