गोल पोस्ट स्पॉटलाइट मालिका विश्‍व आई काळूबाईंच्या भूमिकेत अलका कुबल झळकणार

आई काळूबाईंच्या भूमिकेत अलका कुबल झळकणार

मुंबई : ‘धुरळा’ या चित्रपटात दमदार भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री अलका कुबल एका मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
अलका कुबल देवी काळूबाईच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येणारं आहे. ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ असं लिहित अलका यांनी हा टीझर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. टीझरमधील अलका कुबल यांचा लूक पाहून प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयी फार उत्सुकता निर्माण झाली आहे. अलका यांनी याआधीही पौराणिक कथानक असलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अलका कुबल सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version