आज पासून अर्थसंकल्प पूर्व बैठक सुरू

दिल्ली: २०२०-२१ आर्थिक वर्षासाठीचे सर्वसाधारण अर्थसंकल्प पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सादर केले जाईल. यासाठी अर्थ मंत्रालयाने मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची सोमवारी १६ डिसेंबरपासून पूर्व बजेट बैठक होणार आहे. ज्यामध्ये त्या उद्योग, सेवा, व्यवसाय, कृषी क्षेत्र आणि अर्थतज्ज्ञांशी बैठक घेतील आणि प्रोत्साहनासाठी सल्ले घेतली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सर्व सभांच्या अध्यक्षस्थानी असतील.
१ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाईल. ज्यामध्ये ३१ जानेवारी रोजी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल. २०१५-१६ नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा शनिवारी अर्थसंकल्प सादर केला जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थवेवस्थेच्या मंदीवर मात करण्यासाठी अर्थसंकल्पात अनेक प्रकारच्या सवलती जाहीर करु शकतात. सीतारमण यांचे हे दुसरे बजेट असेल. आर्थिक मंदी लक्षात घेता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे बजेट हे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा