गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई आज सकाळी १०.३० ला शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक

आज सकाळी १०.३० ला शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना आमदारांना बोलावणं धाडण्यात आले. थोड्याच वेळात मातोश्रीवर त्यांची बैठक सुरू होणार आहे आणि या बैठकीमध्ये सत्तास्थापने संदर्भातला फॉर्मुला उद्धव ठाकरे सर्व आमदारांना सांगू शकतात.
दरम्यान अब्दुल सत्तार यांनी सांगितले की आजच्या बैठकीत शिवसेनेचे सर्व ६४ आमदार उपस्थित राहणार आहेत व आम्हाला पुढील निर्देश उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात येतील. शिवसेनेचा कोणताही आमदार फुटणार नाही असा आम्हाला विश्वास आहे असे ते म्हणाले, आणि जर कोणी आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही फोडू व दवाखान्यांमध्ये ही नेहू असे ते म्हणाले.

error: Content is protected !!
Exit mobile version