गोल पोस्ट राजकारण उद्धव ठाकरे असतील मुख्यमंत्री: संजय राऊत

उद्धव ठाकरे असतील मुख्यमंत्री: संजय राऊत

मुंबई: आज मुंबईत सकाळी दहा वाजता एका पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल व येत्या दोन दिवसात याची पुष्टी केली जाईल.
भाजपकडून शिवसेनेला ऑफर आली आहे का या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, आता ऑफर घेणे आणि देणे याचा वेळ संपला आहे आता सरकार हे शिवसेनेचे असेल असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की सगळ्यांची अशी इच्छा आहे की महाराष्ट्र मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे असावेत महाराष्ट्रातील गोरगरीब जनता, शेतकरी आणि कष्टकरी यांची सुद्धा अशीच इच्छा आहे की उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावेत.
पवारांकडून तुमच्या नावाची चर्चा मुख्यमंत्री पदासाठी केली जात आहे असे असे विचारले असता ते म्हणाले की मी काल पवार साहेबांना भेटलो होतो व आमच्यात अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version