राशीभविष्य

मेष: शुभ रंग : पिस्ता | अंक : ६

नोकरीत वरीष्ठ मंडळी खोटी आश्वासने देतील.कुटुंबियांना पुरेसा वेळ देता येणार नाही. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. थकवा जाणवेल.


वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : २

व्यवसायात आर्थिक अडचणींना धैर्याने तोंड द्याल.चैनी व विलासी वृत्तीवर अंकुश ठेवावा लागेल. मानसिक शांती व समाधान मिळवण्यासाठी उपासनेशिवाय पर्याय नाही.


मिथुन : शुभ रंग : आकाशी | अंक : २

भागीदारीच्या व्यवसायात मतभेद संभवतात. फक्त आपलं बघा. कुणी मागितल्याशिवाय सल्ले देऊ नका. मैत्रीत व नात्यांत आर्थिक व्यवहार नकोत.


कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : ३

आज एखादी अविस्मरणीय घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण राहील. एखाद्या शुभकार्यात जोडीने उपस्थित राहाल. छान दिवस.


सिंह : शुभ रंग : तांबूस | अंक : १

कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी आनंदाची बातमी कानी येईल. व्यापारात मोठे धाडस टाळा. खाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. अपचनाचे त्रास संभवतात.


कन्या : शुभ रंग : सोनेरी | अंक : ९ उत्साह व उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील.शेअर्स व्यवहारात अपेक्षित नफा होईल. सौदर्य प्रसाधनांचे व्यवसाय आज तेजीत चालतील. आनंदी दिवस.


तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ७

अध्यात्मिक मार्गात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साधता येईल. कलाक्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. प्रेमाच्या भानगडीत पडूच नका.


वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५

अनपेक्षित प्रवासाचे योग आहेत. काही अती हुषार मंडळींचा सहवास लाभणार आहे. न मागताही कुणी सल्ले देतील. हो म्हणून सोडून द्या. आज वाद टाळा.


धनू : शुभ रंग : भगवा | अंक : ४

राशीच्या धनस्थानेतून चंद्राचे भ्रमण सुरु असताना आज पैशाची कमतरता पडणार नाही. घर सजावटीसाठी खर्च कराल कौटुंबिक सदस्यांमध्ये सलोखा व सामंजस्य असेल.


मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८

आवक पुरेशी असल्याने तुमचे मनोबल उत्तम राहील. व्यावसायिक स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वैवाहिक जीवनात लाडीक रूसवे-फुगवे चालायचेच.


कुंभ : शुभ रंग : पिवळा | अंक : ३ कुणाकडून सहकार्याची अपेक्षा करू नका. स्वावलंबन हिताचे राहील. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. कंजूषपणा सोडून द्या. आज खर्चावर लगाम शक्य नाही.


मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६

दैनंदिन कामे सुरळीत पार पडणार आहेत. दिवस लाभाचा असल्याने व्यवसायात एखादे धाडस करायला हरकत नाही. आप्तस्वकियांत तुमच्या शब्दाला मान राहील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा