आजचे राशिभविष्य

मेष: शुभ रंग : आकाशी | अंक : ५ अथक परिश्रमांच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरू राहील. भावंडात झालेले गैरसमज दूर होतील. उद्योगधंद्यातील उद्दीष्टे सहज साध्य होतील.


वृषभ: शुभ रंग : गुलाबी | अंक : १ आज महत्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे. व्यावसायात आपली आर्थिक क्षमता ओळखून उलाढाली कराव्यात. घराबाहेर वाद टाळा.


मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४ आर्थिक आवक पुरेशी असून आज परिवारात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखादी अडचण शेजाऱ्यांच्या मदतीने दूर होईल. मुले आज्ञा पाळतील.


कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : २ विविध मार्गाने पैसा येईल. हौसमौज करण्यासाठी सढळ हस्ते खर्च करू शकाल. तुमची जिवनशैली उंचावेल. आज तुम्ही मौजमस्तीस प्राधान्य द्याल.


सिंह : शुभ रंग : अबोली| अंक : ९ मुलांचे हट्ट पुरवाल. व्यावसायिकांचे गुंतवणूकीच्या नव्या संधींकडे लक्ष राहील. मुलांच्या आराेग्यास जपा. कोणत्याही कामात अती आक्रमकता नकोच.


कन्या : शुभ रंग : क्रिम| अंक : ७ वादविवादात तुम्ही स्वत:चेच घोडे पुढे दामटवाल.दुपारनंतर आर्थिक व्यवहारात मात्र सावध रहाणे गरजेचे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका.


तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ५ व्यावसायिक उलाढाल वाढेल. खर्च योग्य कारणांसाठी होईल. काही दूरावलेली नाती जवळ येतील. वैवाहीक जिवनांत आज दाेघांत तिसऱ्याला प्रवेश देऊच नका.


वृश्चिक : शुभ रंग : राखाडी| अंक : ८ नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल. वरीष्ठांच्या मागे पुढे करावेच लागणार आहे. कोणतेही कौटुंबिक निर्णय वडीलधाऱ्यांच्या संगनमताने घ्यावे लागतील.


धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ६ कार्यक्षेत्रातील काही मनाविरुध्द घटना तुम्हाला बेचैन करतील. आज जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोतच.


मकर : शुभ रंग : भगवा| अंक : ४ आज तुम्ही फार हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर मात्र महागात पडेल. सामंजस्याचे धोरण हिताचे राहील.


कुंभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३ आज एखाद्या चांगल्या बातमीने दिवसाची सुरवात होईल. धंद्यातील रखडलेली उधारी वसूल होईल. संततीचे विवाहयोग जुळून येतील. दिवस लाभाचा.


मीन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १ सौंदर्य प्रसाधने, चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. ऐशआरामी वृत्ती बळावेल. गृहीणी आज ब्युटी पार्लरसाठी आवर्जुन वेळ काढतील. छान दिवस.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा