आजचे राशिभविष्य

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ९ उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. नोकरदारांना साहेबांच्या तसेच घरात पत्नीच्याही लहरी सांभाळाव्या लागतील.


वृषभ: शुभ रंग : आकाशी | अंक : ७ मनोबल उत्तम असेल. तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील.


मिथुन : शुभ रंग : निळा | अंक : ३ तुमच्या खर्चीक स्वभावामुळे आज पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. एखादा दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. घराबाहेर वाद टाळा.


कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : २ अनपेक्षितपणे धनप्राप्ती होईल. पैशाअभावी रखडलेल्या योजना मार्गस्थ होतील. क्षुल्लक गैरसमजामुळे दूरावलेले अरप्तस्वकीय जवळ येतील.


सिंह : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४ नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. विरोधकांचा जोर आता कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.


कन्या : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३ खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही. कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमाचा उत्साह वाढवतील. मुले अज्ञेत वागतील.


तूळ : शुभ रंग : अबोली| अंक : १ दैनंदीन कामे वेळच्यावेळी पार पडतील. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. काही भग्यवंतांची वास्तूविषयक स्वप्ने साकार होतील. आनंदी दिवस.


वृश्चिक : शुभ रंग : भगवा| अंक : ७ आर्थिक अडचणींवर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील. प्रवास मात्र कंटाळवाणे होणार आहेत. प्रवासात मौल्यवान ऐवज सांभाळा.


धनू : शुभ रंग : जांभळा| अंक : ६ आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.


मकर : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ५ कार्यक्षेत्रात रागरंग बघूनच महत्वाचे निर्णय घ्यावेत. व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करून चालणार नाही. सरकारी कामात विलंब होईल.


कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९ दैनंदीन कामात अडथळे येतील. आरोग्याच्या तक्रारी हैराण करतील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. सत्संगाने मानसिक वाढवता येईल.


मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : ८ नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. थोडयाफार आराेग्याच्या तक्रारी उद्भवतील. काळजी घ्या. काही येणी असतील तर वसूल होतील.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा