मेष: शुभ रंग : मरून | अंक : २ आज शेजाऱ्यांशी मिळून मिसळून रहावे. नोकरीतही सहकारी वर्गाशी जळवून घ्यावे लागणारआहे. कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे.
वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ७ पैशाच्या बाबतीत काहीच कमी पडणार नाही. आज सुसंवादाने अनेक कामे सोपी होतील. भावंडात मात्र क्षुल्लक गोष्टींवरुन मतभेद हाेण्याची शक्यता आहे.
मिथुन : शुभ रंग : गुलाबी | अंक : १ अथक प्रयत्नांच्या जोरावर यशाकडे तुमची वाटचाल चालूच राहील. आज तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होईल. एखाद्या कामासाठी भटकंती होईल.
कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८ थोडीफार आर्थिक ओढाताण होईल. अनावश्यक खर्च कमी करुनच जमाखर्चाचा तराजू समतोल ठेवता येईल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
सिंह : शुभ रंग : राखाडी| अंक : ३ आज काही दूरावलेले नातेसंबंध परत जवळ येतील. पूर्वीच्या अथक परिश्रमांचे फळ दृष्टीक्षेपात येईल. विवाहेच्छूकांना अपेक्षित स्थळांचे प्रस्ताव येतील.
कन्या : शुभ रंग : क्रिम| अंक : १ काही व्यावसायिक उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी असायला हवी. आज कतृत्ववान व्यक्तींचा सहवास लाभेल. अत्यंत व्यस्त दिवस.
तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ७ अत्यंत व्यस्त दिवस असून नोकरीत कामाचे दडपण जाणवणार आहे. काही वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. तुमच्या अधिकारात वृध्दी होणार आहे.
वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी| अंक : ५ तरुणांनी आज हौसमौज करतानाही मर्यादेत रहावे.नितीबाह्य वर्तनाने प्रतिष्ठा धोक्यात येण्याची शक्यता आहे. वैवाहीक जिवनांत थोडी आदळआपट संभवते.
धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : ९ कार्यक्षेत्रात एखाद्या मनासारख्या घटनेने तुमचा उत्साह वाढेल. महत्वाच्या वाटाघाटी करण्यासाठी आज दिवस अनुकूल आहे. विवाह जुळवण्यात मध्यस्ती कराल.
मकर : शुभ रंग : निळा| अंक : ६ कामगारांच्या रास्त मागण्या वरीष्ठांकडून मान्य होतील.बेरोजगारांना रोजगार मिळेल. काही जुने आजार दार ठोठवाणार आहेत. आरोग्याच्या बाबतीत जागरुक रहा.
कुंभ : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ४ आज तुमचा उंची रहीणीमानाकडे कल असेल.चैनी व विलासी वृत्ती जोपासाल. प्रिय व्यक्तीच्या भावना जपण्याचा प्रयत्न कराल. प्रेमप्रकरणे छान फुलतील.
मीन : शुभ रंग : भगवा | अंक : ५ अनपेक्षितपणे हाती पैसा येईल व तो जाण्याचे मार्गही प्रशस्त असतील. बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.प्रेमप्रकरणे डोक्याला ताप होतील. गृहीणींना उसंत नाही.