तालिबान संघटनेने मागच्या १५ ॲागस्ट ला अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर अफगाणिस्तानमधील महिलांना पुन्हा अन्यायच सहन करावा लागत आहे. आता तालिबानने महिलांसाठी नवीन निर्बंध लागू केले, ज्यामुळे महिलांना विशेष त्रास सोसावा लागत आहे. अफगाणिस्तानमधील महिलांनी डोक्यापासून टाचांपर्यंत संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे परिधान करण्याचे आदेश तालिबानी संघटनेने महिलांना दिले आहेत. यात पायाची नखेही दिसली नाही पाहिजेत, असा वटहुकूम जारी करण्यात आला आहे. सध्याच्या हुकूमानुसार जनतेच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम तेजीने सुरु आहे.
तालिबानची गणिते नक्कीच घातक आहेत. महिलांची पूर्ण कपडे घालून गरज असेल तरच घराबाहेर पडावे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नियंमांचे उल्लंघन केल्यास घरातील पुरुषांना शिक्षा केली जाईल. जेवढ्या वेळा महिला नियम मोडतील तेवढ्या जास्त तीव्र शिक्षा पुरुषांना केली जाईल असा आदेश तालिबान सरकारने काढला आहे.
पण याचे परिणाम तालिबान संघटनेला लवकरच भोगावे लागतील. या बंधनांमुळेच तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मान्यता मिळालेला नाही. किंबहुना यामुळेच तालिबानने अनेक देशांना पत्र पाठवूनही समोर समोरील देशांकडून संबंध निर्माण करण्याची विनंती फेटाळली गेली आहे. यामुळेच अफगणिस्तानमघील स्थितीबाबत अनेक देश चिंतेत आहे.
देश ताब्यात घेतल्यानंतरच लगेचच तालिबानने कडक निर्बंध घालण्यास सुरुवात केली. यात खास करुन महिला शिक्षणावर बंदी, महिलेने एकटीने प्रवास करण्यास बंदी असे विचित्र नियम लागू करत महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यास सुरुवात केली. मात्र महिलांनी हे आदेश न पाळल्यामुळे हे नियम नंतर काढून टाकण्यात आले.
राजकीय विश्लेषणानुसार तालिबान संघटनेच्या अशा वागण्सामुळे जनता तर वैतागली आहेच. पण अनेक आजुबाजूचे देश देखील कोणतीही व्यवहार करण्यास धजत नाही. त्यामुळे अफगाणिस्तानमधील आर्थिक व्यवस्था ही कायम अधांतरीच राहणार आहे. त्यामुळे अफगणिस्तान प्रगती पथावर कायम मागे राहत असल्याचं मत विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.
जिथे एकविसाव्या शतकात महिला पुरुषांच्या बरोबर काम करत आहे, तिथे तालिबान संघटना महिलेंची गळचेपी करत आहे. हे सिनेमातले दृश्य नव्हे तर तालिबानने स्थापलेले वास्तव आहे. हे वास्तव कधी पेट घेईल याचा नेम नाही. पण जर हा भडका उडाला तर तालिबानी संधटनेला नक्कीच जड जाईल, हे मात्र खरं .
न्यूज अनकट प्रतिनिधी -तृप्ती पारसनीस