आंबी जवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला

पुणे : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे एमआयडीसीला जोडणारा स्वातंत्र्योत्तर काळातील आंबी येथील इंद्रायणी नदीवरील पुल आज सकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास कोसळला. नदीपात्रात खोल पाणी असल्याने एखादे छोटे मोठे वाहन पुलासोबत नदीपात्रात कोसळले कि काय? याची शक्यता पोलिस तपासत आहेत. एमआयडीसीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या बस गेल्यानंतर पूल कोसळल्याने मोठा अनर्थ टळला.

या पुलावरून तळेगाव एमआयडीसीकडे रोज शेकडो वाहने ये जा करतात. बंदी असूनही डंपर आणि इतर अवजड वाहने सर्रास चालू होती. दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी अवजड वाहनांसाठी लावलेले अडथळे अज्ञात वाहतुकदारांनी जेसीबीने तोडून टाकले आहेत. त्यानंतर वारंवार अर्ज करूनही सार्वजनिक बांधकाम आणि पोलिस अवजड वाहतुक रोखू शकले नाहीत.

त्याचाच परिणाम आज आज सकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास पुलाचा मधला भागच नदीपात्रात कोसळला. अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने भयभीत गावकऱ्यांनी नदीकडे धाव घेतली. वाहने आडवी लावून इशारा देत वाहतुक थांबवण्यात आली आहे. माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांनी पुलाकडे धाव घेत बंदोबस्त लावला.

प्रत्यदर्शीच्या म्हणण्यानुसार, सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नसली तरी. नदीपात्रात खोल असल्याने एखादे छोटे मोठे वाहन पुलासोबत नदीपात्रात कोसळले कि काय? याची शक्यता पोलिस तपासून पाहत आहेत. विशेष म्हणजे ऑगस्ट २०१६ मध्ये कोकणातील सावित्री नदी पुल दुर्घटनेवेळी, आंबी येथील पुलाची तत्कालीन तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करुन पुल वाहतुकीस योग्य असल्याचा निर्वाळा दिला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा