गोल पोस्ट स्पॉटलाइट अमिर खान देशद्रोही?

अमिर खान देशद्रोही?

इस्तांबुल, १८ ऑगस्ट २०२०: कोरोनाच्या या काळात बाॅलिवूड मधील अनेक कलाकार हे प्रचंड ट्रोल होत आहे. यामध्ये सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर तर बाॅलिवूड मधील घराणेशाहीला सोशल मिडीया वर चांगलेच धारेवर धरले जात आहे. त्यात महेश भट्ट पासून ते सलमान खान यांच्यावर देखील चांगलेच ताशेरे ओढले. अशात अमिर खान देखील सध्या नविन वादाच्या भोव-यात अडकला आहे.

बॉलीवूड अॅक्टर आमिर खान पुन्हा एकदा हिंदूवादी संघनेचा निशाण्यावर आला आहे. या वेळी तो चित्रपट ‘लाल सिंह चढ्ढाच्या शूटिंगसाठी तुर्की मध्ये आसून त्याने रविवारी तुर्कीच्या राष्ट्रपतीमच्या पत्नी एमीन एर्दोगन यांची भेट घेतली. इस्तांबुल मधील राष्ट्रपती भवन हुबेर मेंशन मध्ये त्यांची हि भेट झाली आहे. आणि त्यांच्या भेटी दरम्यानचा एक फोटो तुर्कीची प्रथम महिला एमीनने सोशल मीडिया पर शेयर केला आहे.ज्यामुळे अमिर खान पुन्हा एकदा ट्रोल होत आहे.

अमिर खान याची हि वादात अडकण्याची पहिली वेळ नसून, याआधी देखाली तो PK चित्रपटामुळे हिंदूसंघटनेच्या निशाण्यावर आला होता, तर त्याच्या पत्नीच्या असहिष्णुतेच्या विधानामुळे भारतात एकच गदारोळ उडाला होता. ज्यामुळे त्याच्या देशप्रेमावर नेहमीच प्रश्न उपस्थित होत आसतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version