गोल पोस्ट राष्ट्रीय अमित शाह पुन्हा रुग्णालयात भर्ती

अमित शाह पुन्हा रुग्णालयात भर्ती

नवी दिल्ली, १८ ऑगस्ट २०२०: अमित शाह यांनी नुकतीच कोरोनावर मात केली आहे. तर डाॅक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांती करायला लावली आहेे.अमित शाह यांना राम मंदिर भूमीपुजनाच्या आधी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही दिवसातच त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. पण अमित शाह यांना पुन्हा एकदा दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे .कोरोनावर मात केल्यावर त्यांना गेल्या शुक्रवारीच डिसचार्ज देण्यात आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version