नवी दिल्ली : आंध्र प्रदेशात आता तीन राजधान्या असणार आहेत. अशी घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मंगळवारी (दि.१७) रोजी विधानसभेत केली. आता आंध्र प्रदेशातील राजधान्यांमध्ये करनूल, विशाखापट्टनम आणि अमरावतीचा समावेश आहे.
या वेगवेगळ्या राजधान्यामधून सरकार, विधानसभा आणि न्याय प्रक्रियेचे कामकाज केले जाणार आहे. म्हणजेच विशाखापट्टनम् आंध्रप्रदेशची प्रशासकीय कार्यकारी राजधानी असणार आहे. करनूलला न्यायिक राजधानी म्हणून ओळख मिळणार आहे. तर, अमरावती विधिमंडळ राजधानी म्हणून ओळखली जाणार असल्याचं, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सांगितलं आहे.
याबाबत रेड्डी यांनी सांगितले की, राज्याच्या तीन राजधान्या असाव्यात, असा आमचा विचार आहे. त्याची आम्हाला आवश्यकता वाटते. यावर आम्ही गंभीरतेने विचार करत आहोत. यासाठी तीन राजधान्यांबाबत विचार करण्यासाठी एक तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली आहे.
या समितीने दिलेल्या अहवालानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही यावेळी जगनमोहन रेड्डी यांनी म्हटलं आहे.