पंजाब मध्ये आप सरकार पुन्हा अडचणीत! सभापती सह दोन कॅबिनेट मंत्री विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

पंजाब, ३१ ऑगस्ट २०२२: पंजाब मधील तरनतारण येथील कोर्टाने राज्याचे सभापती कुतवार सिंह संधवा आणि कॅबिनेट मंत्री गुरमित सिंह मीत हेअर आणि लालजित सिंह भुल्लर यांच्या विरुध्द मुख्य न्यायदंडाधिकारी बागीचा सिंह यांच्या न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलाय.

२० ऑगस्ट २०२० मध्ये अमृतसर आणि तरनतारण या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये बनावट दारूमुळं झालेल्या मृत्यूंच्या निषेधार्थ जिल्हा प्रशासकीय संकुलासमोर धरणे आंदोलन करण्यात आली. पंजाबमधील तरनतारण, अमृतसर, गुरुदासपूर आणि बटाला जिल्ह्यांमध्ये बनावट दारू पिल्याने १११ लोकांचा मृत्यू झाला होता. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षानं पटियाला, बर्नाला, पठाणकोट आणि मोगासह अनेक ठिकाणी पंजाब मध्ये असलेल्या काँग्रेस सरकारविरोधात आंदोलने केली.

या आंदोलनच्या प्रकणात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांच्या संदर्भात कोर्टाने त्यांना हजर राहण्यात सांगितले होते. पण त्यांनी आपली अनुपस्थिती दाखवली. गेल्या दोन वर्षांत अनेकदा न्यायालयात बोलावूनही ते न्यायालयात हजर झाले नाही म्हणुन मुख्य न्यायदंडाधिकारी बागीचा सिंह यांच्या न्यायालयानं आम आदमी पक्षाचे नेते, मंत्री यांच्या विरुध्द अजामीनपात्र वॉरंट जारी केल आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा