आप नेते सत्येंद्र जैन यांना सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर

दिल्ली, २६ मे २०२३: सर्वोच्च न्यायालयाने आप नेते सत्येंद्र जैन यांना वैद्यकीय कारणास्तव अटींसह सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. परवानगीशिवाय ते दिल्ली सोडू शकत नाहीत आणि मीडियासमोर कोणतेही वक्तव्य करु शकत नाहीत. सत्येंद्र जैन हे मागील काही काळापासून हवाला प्रकरणी तिहार कारागृहात होते.

त्यांना गुरुवारी लोकनायक रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. तिहार कारागृहात चक्कर येऊन ते पडले असल्याचे सांगण्यात आले आहे. जैन यांना आधी दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथून त्यांना लोकनायक रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले.

त्यांना काही दिवसांपासून त्रास होत असल्याची तक्रार तिहार कारागृहा प्रशासनाकडे केली होती. दरम्यान देशाचा हुकूमशाहा चांगल्या माणसाला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जैन यांच्या प्रकृतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. बिकट संकटाचा सामना करण्यासाठी देव त्यांना ताकद देवो, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा