आपच्या खासदाराने ३४ विमान तिकीटे दिली मजुरांसाठी

नवी दिल्ली, दि.४ जून २०२०: कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक लोक आपापल्या घरापासून शहरांमध्ये अडकल्या आहेत. त्यामुळे प्रवासी मजुरांच्या मदतीसाठी बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटी पुढे आले आहेत. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने आतापर्यंत अनेक प्रवासी मजूर, विद्यार्थी व महिलांना त्यांच्या घरी पोहचवले आहे.

आता, मजूर व गरिबांना घरी पोहोचविण्यासाठी आम आदमी पक्षाच्या एका खासदाराने स्वत:ला वर्षाकाठी मिळमारी ३४ तिकीटं देऊ केली आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खासदार संजय सिंह यांच्या निर्णयाचं कौतुक केल आहे.

लॉकडाऊन काळात मुंबई, दिल्ली, बंगळुरुसारख्या मोठ्या शहरात अडकलेल्या मजूर वर्गाला घरी पोहोचविण्याचं काम अनेकांनी केले आहे. त्यात, आता, आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी त्यांना खासदारकीच्या कोट्यातून मिळणारे ३४ विमान प्रवासाची तिकीटं मजूरांना दिली आहेत.

संजय सिंह यांनी बुधवारी ३३ मजूरांसह दिल्लीतून पटना असा विमान प्रवास केला. दिल्लीतील नॉर्थ अवेन्यू निवासस्थानातून ते दुपारी १ वाजता विमातळाकडे रवाना झाले होते. यापूर्वीही दिल्लीत अडकलेल्या युपी आणि बिहारमधील मजूरांना बसमधून घरी पाठविण्याचं काम संजय सिंह यांनी केले आहे. त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा