गोल पोस्ट महाराष्ट्र आपण मुख्यमंत्री म्हणून काय योगदान दिले : रुपाली चाकणकर

आपण मुख्यमंत्री म्हणून काय योगदान दिले : रुपाली चाकणकर

मुंबई : गेल्या पाच वर्षांत आपण मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून आपण राज्यात काय योगदान दिलं. याचं थोडंतरी आत्मपरीक्षण करा आणि तसंही महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला आणि आपल्या अहंकारी विचारांना नाकारलं आहे, असं म्हणत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. फक्त ठाकरे आडनाव असल्यामुळे कोणी ‘ठाकरे’ होत नाही, असा टोला त्यांनी लगावला होता. यालाच रूपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे की,
अमृताताई, खरं तर पराभवामुळे आलेल्या वैफल्यग्रस्त मानसिकतेतून आता आपण स्वतः सावरून, माजी मुख्यमंत्र्यांना देखील मानसिक आधार द्यायला हवा होता परंतु पण साराचं अंधार दिसतोय आपल्या विचारात, अशी बोचरी टीकाही रूपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीसांवर केली आहे.
दरम्यान, सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली, अशा शब्दांत अमृता फडणवीसांनी केलेल्या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version