गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने नातेवाइकांची डॉक्टरांना मारहाण

चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने नातेवाइकांची डॉक्टरांना मारहाण

मुंबई : कल्याण येथील श्रीदेवी रुग्णालयामध्ये डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यात चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली आहे. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये या दोन महिनांच्या चिमुकल्याला नातेवाईकांनी सकाळी साडे सातच्या सुमारास सर्दी आणि खोकल्याच्या कारणास्तव घेऊन गेले होते. त्यानंतर डॉक्टरांनी औषध देऊन त्याला घरी पाठवले. मात्र घरी परत जाताना त्या चिमुकल्याचा रस्त्यातचं मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि ओवर डोसमुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड करत डॉक्टरांना मारहाण केली आहे. डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

तर यासंदर्भात रुग्णालयाशी संपर्क केला असता, यात डॉक्टरांचा कोणताही हलगर्जीपणा नसल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण घटनेचा तपास महात्मा फुले पोलिसांनी सुरू केलेला आहे. त्या चिमुकल्याचा देह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे. मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version