पुणे, १० जून, २०२३ः आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज (भारत ) आणि क्लॅप कंपनी (कोरिया) या कंपनीमध्ये संयुक्त विद्यमाने नुकत्याच सेमीकंडक्टर निर्मितीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. ज्यामुळे भारत आता सेमीकंडक्टर क्षेत्रात पूर्णपणे स्वतःवर निर्भय रहाण्यासाठीचे आर्यन्स कंपनीचे हे मोठे पाऊल आहे.
सद्य परिस्थितीत भारत हा सेमीकंडक्टरच्या बाबतीत पूर्णपणे चीन आणि व्हिएतनाम या देशांवर अवलंबून आहे. त्यामुळे भारतात सर्वच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने महाग आहेत. भारतात नवीन तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंडक्टर तयार झाल्यानंतर भारत ही जगातली अद्ययावत सेमीकंडक्टरची बाजारपेठ ठरेल यासाठी आर्यन्स ग्रुप कार्यरत आहें
आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज भारतात डिस्प्ले फॅब सेटअप करत आहे. भारतात बनवले जाणारे हे ॲारगॅनिक डिस्प्ले कमी प्रमाणात लो पॉवर वापरणारे आहेत. तसेच हे डिस्प्ले पॅनल्स फोल्डेबल आणि पेपर थीम टेक्नॉलॉजी वर आधारित असल्यामुळे याचा विव्हींग एक्सपिरीयन्स हा इतर डिस्प्ले टेक्नॉलॉजीच्या बाबतीत चांगला असणार आहे. याबरोबरच भारतात ट्रान्सपरंट डिस्प्ले देखील बनवणार आहोत. असे डिस्प्ले कार मध्ये कुठेही बसवता येऊ शकतात.
एकंदरीत, भारतात जे तंत्रज्ञान आर्यन्स ग्रुप क्लॅपच्या सहाय्याने आणत आहे, ते तंत्रज्ञान भारतातील मार्केटसाठी गेम चेंजिंग ठरणार आहे. यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतील. यासाठी आर्यन्स ग्रुपने प्राथमिक स्तरावर ८०० ते ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून भविष्यात ही गुंतवणूक नक्कीच वाढत राहील आणि त्यातून विकसनशील भारत तयार होत राहिल, असा विश्वास आर्यन्स ग्रुप ॲाफ कंपनीजने व्यक्त केला.
यावेळी आर्यन्स ग्रुपचे सर्वेसर्वा मनोहर जगताप यांनी सांगितले की, भारतात नवीन तंत्रज्ञान आणून त्यानुसार सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताला प्रगत आणि स्वावलंबी करण्याचे आमचे ध्येय आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यातीलच एका प्रयत्नाला आलेले यश म्हणजे क्लॅप आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये झालेला हा करार होय.
या कोरियन कंपनीसोबत आम्ही भारतात एकत्रित काम करणार असून या अंतर्गत ॐळ्Eड डिस्प्ले फॅब प्रस्थापित करत आहोत. आम्ही भारतात आत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित डिस्प्ले तयार करत आहोत जे ट्रान्सपरंट, फ्लेक्झिबल आणि लो पॅावर कंज्यूम करणारे असतील. ज्यामुळे भारतातील सर्व उत्पादने नक्कीच स्वस्त होऊन सर्व सामान्याला त्याचा लाभ होईल, हा आमचा यामागचा उद्देश आहे. यावेळी आर्यन्स ग्रुप ॲाफ कंपनीचे सीईओ आणि सीएफओ मनोहर जगताप, प्रोजेक्ट संचालक ईश्वर वाघमारे आणि संचालक कामेश मोदी उपस्थित होते. तर क्लॅप कंपनीकडून सीईओ संग हो कीम, व्हाईस प्रेसिडंट अस्टिन को आणि सीऔ डॅनिएल चो उपस्थित होते.
आर्यन्स ग्रुप विषयीः आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. ज्यामध्ये मीडिया अँड इंटरटेनमेंट, पब्लिकेशन्स, एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिअल इस्टेट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हॉस्पिटॅलिटी, हेल्थकेअर, फायनान्स, ग्रीन एनर्जी, बिजनेस एनसीलरी सर्विस, फार्मासिटिकल्स, एव्हिएशन, पेट्रोकेमिकल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गोल्ड रिफायनरी, इलेक्ट्रिक वेहिकल्स, एग्रीकल्चर अँड ऑरगॅनिक फार्मिंग या क्षेत्रांमध्ये सक्रिय काम करत आहे.
अनकट प्रतिनिधी