पुणे, २८ मार्च २०२१: ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ ने काल आपल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. कोरोनाचा वाढता धोका पाहता सरकारने दिलेल्या नवीन नियमावलीनुसार कंपनीने आपल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पाडले. यावेळी कंपनीने आपल्या अनेक महत्वकांशी प्रकल्पांपैकी बायॉगॅस, बायॉ एनर्जी आणि बायॉफ्यूल यांसारख्या रिन्यूएबल प्रकल्पांचे देखील उद्घाटन केले. या आपल्या विविध प्रकल्पांमधून कंपनी तब्बल १,८०० पेक्षा जास्त रोजगार निर्मिती करणार आहे.
आपल्या या महत्वकांशी प्रकल्पा अंतर्गत कंपनी कचऱ्यापासून वीज निर्मिती, इंधन निर्मिती तसेच निरुपयोगी प्लास्टिक पासून इंधनाची निर्मिती करणार आहे. अशा रिन्यूएबल एनर्जी सेक्टर मध्ये कंपनी काम करत आहे. या प्रकल्पांतर्गत कंपनी देशातील अनेक राज्यांमध्ये काम करत आहे ज्यामध्ये राजस्थान, तमिळनाडू आणि राज्यातील तीन ठिकाणी काम करत आहे.
भारत सरकार गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल, डिझेल अशी प्रदूषण करणाऱ्या इंधनांचा वापर कमी करण्यावर जोर देत आहे. याला पर्याय म्हणून रिन्यूएबल एनर्जी वापर करण्यास सरकार प्रवृत्त करत आहे. हे लक्षात घेता कंपनी या क्षेत्रात आपली महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
कोळशाला पर्याय म्हणून रिसायकल वेस्ट वापरून कंपनी विज निर्मिती करणार आहे. ज्याप्रमाणे कोळशाला जाळून उच्च तापमानावर पाण्याच्या वाफेवर जनित्रे फिरवले जातात त्याचप्रमाणे रिसायकल वेस्ट ला इंधन म्हणून वापर करून उच्च तापमानावर पाण्याच्या वाफेच्या सहाय्याने जनित्र फिरवून वीज निर्मिती केली जाईल. प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून हे एक महत्वाचे पाऊल ठरू शकते. तर दुसरीकडे जागतिक स्तरावर भारत देखील ग्रीन एनर्जी मध्ये महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे.
या प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. ज्यामध्ये ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ चे सी ई ओ श्री. मनोहर जगताप, ‘आर्यन्स् ग्रुप ऑफ कंपनीज’ चे सदस्य श्री. जोश्वा, श्री. विपुल बंसल- पी. एस. (प्रायव्हेट सेक्रेटरी) फायनान्स मिनिस्टर, श्री. बिंदू कुमार- पी. एस. मिनिस्टर ऑफ स्टेट फायनान्स मिनिस्टरी, श्री. डॉ. अजयभूषण प्रसाद पांडे- फायनान्स सेक्रेटरी, श्री. विवेक कुमार, पी. एस. टू पीएमओ (प्रधानमंत्री कार्यालय), श्री. प्रतिक दोशी- ओएसडी रिसर्च अँड स्ट्रॅटेजी डिपार्टमेंट पीएमओ, श्री. डॉ. राजीव कुमार- व्हाईस चेअरमन निती आयोग, श्री. अनुप वादुवा- सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, श्री. विवेक कुमार देवगन- ॲडिशनल सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ पॉवर आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे