पवईमाळचे,५ नोव्हेंबर २०२० : ग्रामपंचायत पवईमाळचे उपसरपंच मयूर कदम यांनी १ नोव्हेंबर पासुन गावातील रखडलेल्या विकासकामा संदर्भात सुरू केलेले आमरण उपोषण आज चौथ्या दिवशी पो. उपनिरीक्षक कवितके साहेब, ऍड. केशवबाप्पू जगताप, सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे यांच्या हस्ते सरबत घेऊन सोडले.
होळ ते कदम वस्ती यादरम्यानचा रस्ता हा ग्रामपंचायतीच्याच मालकीचा असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार फंडातून डांबरीकारणासाठी मंजूर निधीतून आम्ही त्वरीत काम सुरू करीत आहोत.असे प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर मयूर कदम यांनी आज उपोषण सोडले.
उपोषणा दरम्यान सर्व कदम कुटुंबीय, पवईमाळचे सर्व ग्रामस्थ व हितचिंतक मित्रपरिवार यांचे विशेष सहकार्य व पाठिंबा तसेच प्रशासनाचे सर्व पदाअधिकारी यांच्या योग्य निर्णयाबद्दल कदम यांनी आभार मानले. गेली दोन वर्षे सुरू असलेला रस्त्यासाठीचा लढा हा कदम कुटुंबीय व ग्रामस्थांनी सततच्या योग्य मार्गाने केलेल्या प्रशासनाच्या
पाठपुराव्यामुळे यशस्वी झाला आहे असे मयूर कदम यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी -अमोल यादव