अभाविप आणि न्यूजअनकट च्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

पुणे, ९ जुलै २०२१ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आज ९ जुलै २०२१ रोजी ७२ वर्ष पूर्ण झाली. यामुळे, पूर्ण देशभरात जागोजागी आजचा दिवस विद्यार्थी दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यकर्त्यांनी जागोजागी वेगवेगळे उपक्रम राबवले. अभाविप चे सेवाकार्य पाहता, न्यूजअनकट ने एक मदतीचा हात पुढे केला आणि अभाविप व न्यूजअनकट च्या संयुक्त विद्यमाने अभाविप डेक्कन नगर मधील जनवाडी या भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

अभाविप च्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून न्यूजअनकट च्या सहकार्याने अभाविप, डेक्कन नगर मंत्री अभिजीत हुडेकर, डेक्कन नगर संपर्क प्रमुख प्रगती कराड, रश्मी माहुरकर, आणि इतर कार्यकर्त्यांच्या हस्ते हा वस्तू वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा