अभाविप फर्ग्युसन महाविद्यालयातील शाखेच्या मागणीला यश

पुणे, दिनांक २० मे २०२०: कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीकडे लक्ष देत गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय उदय सामंत यांनी विद्यापीठातील तसेच महाराष्ट्रातील सर्व कॉलेजच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. फक्त अंतिम वर्षांच्या परीक्षा होतील असा देखील निर्णय दिला.

फर्ग्युसन महाविद्यालय हे स्वायत्त असल्याने या सर्व बाबतीत महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर देखील कोणतीही अधिकृत माहिती नव्हती. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अनेक विद्यार्थ्यांनी याबाबत अभाविप फर्ग्युसन महाविद्यालय शाखेला विचारणा केल्याने, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अभाविप शाखेने दि.१८ मे रोजी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना याबाबत ई-मेल करून विचारणा केली तसेच लवकरात लवकर योग्य तो निर्णय द्यावा अशी विनंती देखील केली.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रशासनाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या तक्रारीची दखल घेत लगेच दुसऱ्या दिवशी दि.१९ मे रोजी सायंकाळी यूजीसी गाइडलाइन्स व उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे परिपत्रक काढले. व विद्यार्थ्यांना परीक्षांबाबत योग्य ती माहिती दिली. त्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा गोंधळ मिटला.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा