अभाविपने केले महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत

परभणी, १५ फेब्रुवरी २०२१: कोविड १९ मुळे गेले ११ महिण्यांपासून सर्व महाविद्यालये बंद होते. कोरोणा काळात संपुर्ण भारताने अत्यंत यशस्वीपणे जगाचे नेतृत्व केले आहे, पण आता परिस्थिती पुर्वरत येत आहे.

शासनाने आत्ता पर्यंत भरपुर श्रेत्र उघडले आहे परंतु, शिक्षणाचे मंदीर असलेले महाविद्यालये मात्र बंद ठेवले.बियर बार चालु केले शिक्षण घर बंद ठेवले. हिच शासनाची चुक लक्षात घेऊन अभाविपने २ फेब्रुवारी रोजी सरकारच्या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलने केले. महाराष्ट्र शासनाने या आंदोलना दरम्यान पुणे लातूर सारख्या ठिकाणी सामन्य विद्यार्थ्यांना अटक सुधा केली. परंतु, अभाविप ने महाविद्यालय उघडलीच पाहिजेत असे ठणकावून सांगत विजय संपादित केला. म्हणजेच शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये उघडण्यास आदेश दिले.

म्हणुनच आज १५ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, परभणी ने श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून ढोल ताशाच्या गजरात फटाक्याची आतिशबाजी करत तसेच साखर वाटत सर्व विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले, अशी माहीती अभाविप चे शहर मंत्री अद्वैत पार्डीकर यांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा