शैक्षणिक समस्येमुळे अभाविप करणार निदर्शन

9

पुणे, २५ ऑक्टोबर २०२०: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्येमुळे उद्या दिनांक २६ ऑक्टोबर २०२० रोजी निदर्शन करणार असल्याचे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी सांगितले.

इयत्ता ११ वी च्या सर्व प्रवेश प्रक्रिया या पुर्णपणे थांबल्या आहेत. तरी, या प्रक्रिया थांबल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, सद्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर लक्ष देत, ११ वी च्या प्रवेश प्रक्रिया या लवकरात लवकर चालू करावी, यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगर हे उद्या दिनांक २६ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग संचालनालय, बावरीया मोटर्स समोर पुणे कॅम्प. जिल्हाधिकारी कार्यालय जवळ येथे निदर्शन करणार आहे.

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ हे देखील उपस्थित असणार, असे अभाविप पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी सांगितले.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड