विद्यार्थ्यांसाठी अभविपने सोशल मीडियावर राबवले अभियान

पुणे, दि.७ मे २०२०: कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये विद्यापीठ प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा शुल्क आकारले जात आहे. तसेच परीक्षा शुल्क निगडित असलेले लेट फीच्या नावाखाली हजारो रुपयांची लुटमार केली जात आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे.

यासाठी अभाविप पुणे महानगराच्या वतीने विद्यार्थी हितार्थ विद्यापीठाला मेलद्वारे अशी मागणी केली आहे की, अशा संकटाच्या काळात विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाऊ नये, असे आवाहन या मेलद्वारे करण्यात आले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज (गुरुवारी) दु. १२.३० वा. सोशल मीडियावर अभियान देखील चालवले गेले.
या अभियानात सर्वांनी सहभागी होऊन आपल्या व्यतिगत खात्यावरून तसेच ABVP Pune पेज वरची पोस्ट शेर करायची .त्यासोबतच #ShameOnSPPU वापरून शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री, सिनेट सदस्य, कुलगुरू, राज्यपाल यांना टॅग करण्याचे आवाहन अभाविपचे पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना केले असून त्याद्वारे ही मोहीम चालवण्यात येत आहे.
फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम आणि व्हाट्सऍप या सोशल मीडियावर ही मोहीम चालवण्यात आली आहे .

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा