पुणे, ५ ऑक्टोबर २०२०: अंतिम वर्षाच्या परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पार पडत आहे. पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाने परीक्षांची तयारी केलेली आहे, परंतु ह्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. परीक्षेचे काही अभ्यासक्रमांचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केलेलं नाही, तसेच Mock Test संदर्भात अजूनही कोणतेच परिपत्रक काढलेले नाही. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र मिळालेले नाही. याबाबत अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत.
पाच वर्षांचे विधी (BA LLB) चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर BA ची पदवी प्राप्त होते, परंतु विद्यापीठाने पदवी अजूनदेखील दिलेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विविध परीक्षांना अर्ज करता येत नाही. Internship करता येत नाही, तरी विद्यापीठाने तात्काळ याबाबत निर्णय घेऊन पदवी देण्यात यावी.
MSW हा प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पूर्ण करण्याचा अभ्यासक्रम आहे, परंतु कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण चालू आहे. तरी विद्यापीठाने अशा अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशा स्वरूपाचे नियोजन करावे. विद्यापीठातील वसतीगृहात राहत असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठाने परिपत्रक जारी केले आहे व आपले साहित्य तात्काळ घेऊन जाण्याचे आदेश दिले आहे. तरी विद्यार्थी गावाला असल्या कारणास्तव याबाबत मुदत वाढवून देण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना सहकार्य करावे.
अशा अनेक समस्यांना घेऊन आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगराच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतली. तसेच परीक्षा नियंत्रकासोबत चर्चा केली व या सर्व संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा विद्यापीठात तीव्र आंदोलन करेल असा इशारा पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला.
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रगती कराड