अभाविपचे अभ्यासिका खोलो आंदोलन

नांदेड २३ ऑक्टोबर २०२०: कोरोना सर्वांसाठी अनपेक्षित संकट होते. मात्र आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राज्यात सुमारे चार लाख रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र ज्ञानाचे केंद्रे आपण का बंद ठेवत आहोत ? यामुळे, आज दिनांक २३ ऑक्टोबर २०२० रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नांदेडने अभ्यासिका सुरु करण्यात याव्यात यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका नांदेड येथे अभ्यासिका खोलो आंदोलन केले.

विद्यार्थ्यांना या संकटाच्या काळात सुध्दा विविध परीक्षांची तयारी करावी लागते. अनेकांना अभ्यास करण्यासाठी योग्य ते वातावरण मिळत नाही; मात्र, अभ्यासिकेत ते उपलब्ध असते. जर आपण होटेल्स सारखी ठिकाणे सुरु करू शकतो तर मग अभ्यासिका का सुरू करू नये ? असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशमंत्री स्वप्निल बेगडे यांनी मत मांडले; आणि, अभ्यासिका सुरु करण्यात याव्या यासाठी नांदेड अभाविप ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका येथे आंदोलन केले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेशमंत्री श्री.स्वप्निल बेगडे यांची विशेष उपस्थिती होती व उप जिल्हाअधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी नांदेड महानगर मंत्री बस्वराज मेंगापुरे, गणेश बोडके, राजु नरवाडे, वैभव देऊलवाड, शांभवी साले, वेदिका शोनक, अजिंक्य लाटकर, गोविंद बोडके, नीरज चौधरी तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा