मंगळवेढा, सोलापूर ६ नोव्हेंबर २०२३ : मंगळवेढा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीमध्ये पंचवार्षिक निवडणूक लागली होती. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते अभिजीत आबा पाटील यांनी काही ठिकाणी स्वतंत्र पॅनल, तर काही ठिकाणी समविचारी लोकांच्या माध्यमातून आपला पॅनल उभा केला होता. यानिवडणुकीत अभिजीत पाटलांना घवघवीत यश प्राप्त झालेले दिसून येत आहे. काही ठिकाणी सरपंच तर काही ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य पदाची बाजी अभिजीत पाटील यांच्या गटाने मारलेली दिसून येत आहे…
एकीकडे राज्यामध्ये अजित पवार व शरद पवार यांच्यामध्ये फूट पडून देखील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे खंबीरपणे शरद पवार यांच्या सोबत उभे राहिले. शरद पवार यांच्या नेतृत्वात अभिजीत पाटील यांनी मंगळवेढा तालुक्यात जोमाने आपला गट व पक्ष बांधणीकेलीय. या मध्येच पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची चाचणी झाल्याचे बोलले जात आहे.
या निवडणुकीत शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी मोठ्या ताकदीने अभिजीत पाटील यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहिलेले दिसून आले. मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी, खडकी, देगाव, शिरशी, शेलेवाडी, डिसकळ, निबोंणी, मानेवाडी, रेड्डे, आंधळगाव, खूपसंगी या ग्रामपंचायतीमध्ये आपले पॅनल निवडून आल्याबद्दल उमेदवारांचे अभिनंदनपर सत्कार श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : दगडू कांबळे