अभिनयाची “परिणीती” विद्या बालन

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनयाची “विद्या” म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री विद्या बालन. हीचा आज वाढदिवस. अनेक हिंदी, मल्याळम, तामिळ चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून एक आपले स्थान निर्माण करणारी कष्टाळू अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. तिच्या विषयी थोडंस…

विद्या बालन हिचा जन्म १ जानेवारी १९७८रोजी झाला. एक भारतीय सिने अभिनेत्री म्हणू तिची आज जगभर ओळख आहे. सध्या भारतामधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक विद्या मानली जाते. १९९५ सालच्या “हम पांच” या झी टीव्हीवरील विनोदी धारावाहिकामध्ये काम करून विद्याने अभिनयाची सुरूवात केली. २००५ सालच्या “परिणीता” ह्या हिंदी चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.
विद्याला आजवर एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार, ५ स्क्रीन पुरस्कार इत्यादी अनेक सिनेपुरस्कार मिळाले आहेत. २०१४ साली भारत सरकारने तिला ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवले आहे. याशिवाय तिने आतापर्यंत तमिळ , हिंदी, मल्याळम आणि बंगाली भाषेत चित्रपटांत कामे केली आहेत. हिंदीमधील, द डिर्टी पिक्चर, हमारी अधुरी कहाणी, मिशन मंगल, लगे रहो मुन्नाभाई, भुलभुलौय्या, किस्मत कनेक्शन, हल्ला बोल, इस्कीया, हे बेबी आदी सुपर हिट चित्रपट तिच्या नावावर आहे.
तिच्या या अभिनयाला सलाम.

विद्या बालन हिला “न्युज अनकट” टिमकडून वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा